Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha – Details, episodes & analysis
Podcast details
Technical and general information from the podcast's RSS feed.

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
Ep.Log Media
Frequency: 1 episode/14d. Total Eps: 27

आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा..
संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे.
सृजन सख्या ची माहिती
विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.
Recent rankings
Latest chart positions across Apple Podcasts and Spotify rankings.
Apple Podcasts
🇬🇧 Great Britain - hinduism
29/08/2025#98
Spotify
No recent rankings available
Shared links between episodes and podcasts
Links found in episode descriptions and other podcasts that share them.
See all- https://omnystudio.com/listener
1120746 shares
- https://www.eplog.media
185 shares
- https://eplog.media/
172 shares
- https://facebook.com/eplogmedia
422 shares
- https://twitter.com/eplogmedia
422 shares
RSS feed quality and score
Technical evaluation of the podcast's RSS feed quality and structure.
See allScore global : 83%
Publication history
Monthly episode publishing history over the past years.
आज हिंदु नववर्षदिन अर्थात गुढीपाडवा” म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा..
Season 1 · Episode 26
mercredi 22 mars 2023 • Duration 19:35
सर्वात प्रथम हिंदु नववर्षदिनाच्या सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा !!! गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा' या पॉडकास्ट मालिकेची सुरुवात झाली. गेल्या वर्षभरात आम्ही ह्या मालिकेअंतर्गत २६ भाग सादर केले. यातील प्रत्येक भागात हिंदू सणांची, उत्सव, परंपरांची आणि त्याचबरोबर काही राष्ट्रीय सण तसेच महत्त्वाच्या दिनविशेषांची माहिती देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक भाग सादर करताना आम्हाला पुस्तके, ग्रंथ, काही मान्यवर व्यक्ती आणि अर्थातच एपिलॉग मीडियाचे अभिजीतसर, रोहन व सर्व तंत्रज्ञ यांची मदत झाली. त्या सर्वांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. ह्या आमच्या पॉडकास्ट मालिकेतील सर्व भागांविषयी संक्षेपात माहिती देण्याचा प्रयत्न, आम्ही ह्या शेवटच्या भागात केला आहे. आम्हाला खात्री आहे, की, ही माहिती ऐकल्यावर जर तुम्ही आजपर्यंत यापैकी कोणताही भाग मिस केला असाल, तर तो नक्कीच ऐकाल आणि सर्व सणांची माहिती नक्की एन्जॉय कराल... याच नोटवर आम्ही आपली रजा घेतो. धन्यवाद🙏
सहभाग -
डॉक्टर सौ. स्वाती कर्वे, सरोज करमरकर,
अपर्णा मोडक.
See omnystudio.com/listener for privacy information.
होळी रे होळी, पुरणाची पोळी
Season 1 · Episode 25
lundi 6 mars 2023 • Duration 12:01
नमस्कार श्रोतेहो,
तुम्हा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
मनातील सर्व राग-रुसवे , हेवेदावे विसरून आनंदाने हिंदू नववर्षाची सुरुवात पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने करावी असे सांगणारा हा होळीचा सण .. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा.. होळी पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमा. जागोजागी संध्याकाळी पेटवलेल्या होळ्या, नैवेद्याला खुसखुशीत पुरणपोळी ही ह्या सणाची खासियत. त्याचबरोबर होळीच्या दुसऱ्या दिवशी येणारे धुलीवंदन आणि पंचमीला येते ती रंगपंचमी ... वसंत ऋतूत येणारा, रंगांची उधळण करणारा हा सण लहान-थोर साऱ्यांच्याच आवडीचा...या सगळ्याबद्दल जाणून घेऊया या पॉडकास्ट मधून. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतात कसा साजरा केला जातो याबद्दलही ऐकूया.
सादरकर्त्या ... अपर्णा, सरोज आणि वैद्या स्वाती...
मग नक्की ऐका...
संकल्पना व सहभाग -
सौ.अपर्णा मोडक
वैद्या स्वाती कर्वे
सौ.सरोज करमरकर
See omnystudio.com/listener for privacy information.
सण आला बैलपोळ्याचा | Festival of the bailpola - Bulls
Season 1 · Episode 16
vendredi 26 août 2022 • Duration 08:08
आजचा आपला पॉडकास्ट हा श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येच्या दिवशी सादर करतोय. आजचे वैशिष्ट्य म्हणजे बैल पोळा. आपल्यासाठी वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा खरा सोबती बैल.. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून..
संकल्पना व सहभाग -
सौ. अपर्णा मोडक
सौ. सरोज करमरकर
वैद्या सौ. स्वाती कर्वे
Today's podcast is being presented on the last day of the month of Shravan i.e. on the day of Amavasya. Today's feature is Bulls. Bull is the true companion of the farmers who work in the fields for us all year round.. Let's express our gratitude to him through this podcast today..
Concept and Participation -
Mrs. Aparna Modak
Mrs. Saroj Karmarkar
Vaidya Mrs. Swati Karve
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media
See omnystudio.com/listener for privacy information.
गोविंदा आला रे आला | Govinda ala re ala
Season 1 · Episode 15
vendredi 19 août 2022 • Duration 21:44
"तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा.. गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा"... अशी गाणी आणि त्याबरोबर धमाल मस्तीत नाचणारी गोविंदा पथके... काय आला ना डोळ्यासमोर गोकुळाष्टमीचा उत्सव..आपल्या सगळ्यांचा जिवलग सखा कृष्ण.. चला तर या कृष्णाबद्दल थोडं मनातलं बोलूया- आजच्या आपल्या पाॅडकास्टच्या माध्यमातून "गोविंदा आला रे आला"
संकल्पना व सहभाग -
सौ. अपर्णा मोडक
सौ. सरोज करमरकर
वैद्या सौ. स्वाती कर्वे
श्री. पुनीत करमरकर
"Govinda re gopala, yashodechya tanhya bala, Govinda Re Gopala"... such songs and the Govinda troupe dancing along with them. An very enthusiastically celebrated festival is Gokulashtami festival.Its celebrated on the day of Shravan Ashtami which is lord krishna's birthday. Krishna is our dearest friend.. Let's talk heart to heart about Krishna - through our podcast "Govinda Aala Re Aala"
Concept and Participation -
Mrs. Aparna Modak
Mrs. Saroj Karmarkar
Vaidya Mrs. Swati Karve
Mr. Puneet Karmarkar
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media
See omnystudio.com/listener for privacy information.
वंदे मातरम् | Vande Mataram
Season 1 · Episode 14
lundi 15 août 2022 • Duration 08:29
Today is August 15, 2022. Amritmahotsav (75 years) of the Independence Day of our country India! Best wishes to all our listeners on India's 75th Independence Day... On this occasion we, Srujan Sakhya are presenting a POWADA. This veer Rasapurna Powada written by Shaheer Pralhad Rai which depicts the inspirational story of Rani Lakshmibai's struggle in 1857 !!!
Presenting Srujan sakhya with Eplog Media... Today's Podcast "Vande Mataram"
Concept and Writing -
Mrs. Saroj Karmarkar
Mrs. Aparna Modak
Dr. Mrs. Swati Karve
आज १५ ऑगस्ट २०२२. आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव ! आपल्या सर्व श्रोत्यांना भारताच्या ७५व्या म्हणजेच अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा... यानिमित्ताने आम्ही सृजन सख्या आज सादर करीत आहोत... राणी लक्ष्मीबाईंच्या १८५७ सालच्या लढ्याचे यथार्थ वर्णन करणारा शाहीर प्रल्हाद राय यांच्या लेखणीतून साकारलेला वीररसपूर्ण पोवाडा !!!
सादर करतोय Eplog मीडियाबरोबर सृजनसख्या... आजचा पॉडकास्ट "वंदे मातरम्"
संकल्पना -
सौ.सरोज करमरकर
सौ.अपर्णा मोडक
वैद्या सौ स्वाती कर्वे
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media
See omnystudio.com/listener for privacy information.
श्रावण आला.. सणांनी सजलेला नटलेला | Shravan ala, sananni natalela sajalela
Season 1 · Episode 13
jeudi 11 août 2022 • Duration 23:02
नागपंचमीनंतर सर्वांना वेध लागतात ते नारळीपौर्णिमेचे..कोळी बांधवांसाठी महत्त्वाचा असलेला हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यांची रोजीरोटी ज्यावर अवलंबून आहे, असा समुद्रदेव आणि त्याची अधिष्ठाती देवता वरूणराज याची पूजा करून कोळीबंधव हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात. याच दिवशी राखीपौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हा भावा-बहिणींमधील प्रेमाचा धागा घट्ट करणारा आणि त्यांच्यातील आपुलकी, मायेचा सण म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील महिला वर्गाचे आवडते मंगळागौरीचे व्रत व जिवतीपूजनाचीही माहिती घेऊया आमच्या आजच्या पाॅडकास्ट मधून
" श्रावण आला.. सणांनी सजलेला, नटलेला".
सादर करतोय Eplog मीडियाबरोबर सृजनसख्या...
संकल्पना व लेखन -
सौ.सरोज करमरकर
सौ.अपर्णा मोडक
वैद्या सौ स्वाती कर्वे
After Nag Panchami everyone is interested in Narali Poornima..This is an important festival for the Koli brothers. Kolibandhav celebrate Naralipaurnima with great gaiety by worshiping the sea god and his presiding deity Varunaraja, on whom their livelihood depends. On this day, Rakhi Poornima i.e. Raksha Bandhan is celebrated as a festival to strengthen the thread of love between brothers and sisters. It helps to strengthen their affection and love. Along with this, let's also learn about Mangalagouri Vrat and Jivati Pujan, the favorite of women in the month of Shravan, from our today's podcast.
" Shravan ala, sananni natalela sajalela".
Presenting Eplog Media's creation with...Srujan Sakhya
Concept and Writing -
Mrs. Saroj Karmarkar
Mrs. Aparna Modak
Dr. Mrs. Swati Karve
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media
See omnystudio.com/listener for privacy information.
पंचमीचा सण आला | Importance of Nag panchami
Season 1 · Episode 12
mardi 2 août 2022 • Duration 11:24
श्रोतेहो, श्रावण महिना सुरू झाला की सणांची मालिका सुरू होते, ती नागपंचमीपासून .....
नागपंचमीच्या पूजनाचे महत्त्व, माहेरवाशिणींचं त्यानिमित्ताने माहेरी येणं, मैत्रिणींबरोबर सणाची मजा लुटणे, तसेच या सणाचा पर्यावरणाशी असलेला संबंध, या सगळ्याचा आढावा घेऊया आजच्या ,
पंचमीचा सण आला या पाॅडकास्ट मधून.... सादर करतोय Ep.Log media बरोबर सृजनसख्या...
संकल्पना व लेखन
सौ.सरोज करमरकर
सौ.अपर्णा मोडक
वैद्या सौ स्वाती कर्वे
Welcome listeners to the festival of Panchami..Nag Panchami is celebrated in the month of Sravan. As Shravan begins, a series of festivals start and this is truly the Festival King.
Today, let's take a look at the importance of Nagpanchami worship, Mahervashini's coming home on that occasion, enjoying the festival with friends, and also the relationship of this festival with the environment.
Panchamicha san aala From this podcast....
Presented by Srujan sakhya and Ep.Log Media
Concept and writing
Mrs. Saroj Karmarkar
Mrs. Aparna Modak
Dr. Swati Karve
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media
See omnystudio.com/listener for privacy information.
Divya Divya Deepotkar | दिव्या दिव्या दीपोत्कार
Season 1 · Episode 11
jeudi 28 juillet 2022 • Duration 21:03
The Deep (lamp)...It's a symbolic version of our energy source Suryadev(Sun). It's a true symbol of light, pure knowledge, energy, and liveliness.
Our daily pooja or any of our auspicious occasions can't start without the ritual of lighting a lamp. It's the gratitude we offer to Agnidev.
Deep comes in various forms like Diwa, Panati, samayee, niranjan and many more. It has very special importance in our Hindu culture.
Today is आषाढ अमावस्या-- 'दिव्यांची आवस' which is specially celebrated for honoring this symbol of energy... Deep. This day is also known as गतहारी अमावस्या.
Do listen to our podcast " Divya Divya Deepotkar " to know more about this Deeppujan and Gatahari Amavasya. Also understand the science and the importance of many leafy vegetables,(रानभाज्या) which are specially grown and consumed in the rainy season.
So listeners...stay tuned with podcast 'utsavsananchamelsanskrutiparamparancha' with srujanskhya and Ep.Log Media.
Presented by -
Sau.Aparna Modak
Sau. Saroj Karmarkar
Vaidya Sau.Swati Karve
हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे .रोजच्या पूजेत किंवा कोणत्याही शुभकार्याच्या प्रसंगी, प्रथम दिव्याची पूजा करून सुरुवात केली जाते .
या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करतात आणि अज्ञानाचा अंधकार दूर होऊन, ज्ञानाचा मंगलप्रकाश पसरू दे अशी दिव्याला प्रार्थना करतात. तसेच हा दिवस गताहारी अमावास्या म्हणूनही ओळखला जातो, त्याबद्दल विशेष माहिती अवश्य ऐका.
तसेच ह्यादिवसात उगवणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व आणि माहिती याबद्दलही काही खास जाणून घ्या.
या मालिकेद्वारे आपल्या हिंदू सण समारंभाची माहिती आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवतो. अभिवाचन ,गोष्टी ,विवेचन, लोकगीत गायन, गजर, भजन-कीर्तन या सर्व कला प्रकारांनी ही माहिती रंजक पद्धतीने तुमच्यासमोर सादर करणे हा आमचा मानस.
आतापर्यंत चैत्र आणि वैशाख महीन्यात आपले पाच podcast रिलीज झाले. या महिन्याचा पाॅडकास्ट आम्ही आज म्हणजेच 28 जुलै रोजी आषाढ अमावास्या म्हणजेच दिव्याच्या अमावस्येच्या निमित्ताने तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत.
आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी, सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ही podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा..
अंतर्गत,
दिव्या दिव्या दीपोत्कार
हा भाग नक्की ऐका, like करा, शेअर करा..
😊 धन्यवाद...🙏
संकल्पना व लेखन - सृजन सख्या... सौ. अपर्णा मोडक, सौ. सरोज करमरकर, डॉ. सौ. स्वाती कर्वे...
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media
See omnystudio.com/listener for privacy information.
गुरुविण नाही दुजा आधार | Guru Purnima Special
Season 1 · Episode 10
mercredi 13 juillet 2022 • Duration 23:17
"Guruvin nahi duja aadhar - Our greatest piller is our Teacher" A special podcast on the occasion of Gurupournima..
Today is the auspicous occassion of Gurupournima ..also known as Vyaspournima. This is the day to worship our greatest Hindu guru Maharshi Vyas. The day of Gurupournima is also to express our gratitude for every Guru qho enriches our life..
Through our today's podcast "Guruvin Nahi Duja Aadhar-Our greatest piller is our Teacher" we would get to know something special about Guru Purnima as well as every direct and indirect Gurus who help us in different stages of our lives.
So do listen to the podcast !!
Presented by -
Srujan Sakhya
Sau. Saroj karmarkar
Vaidya Sau. Swati Karve
Sau. Aparna Modak
आज आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा.. अर्थात व्यासपौर्णिमा. आपल्या हिंदू धर्मातील महान गुरु महर्षी व्यास यांचे पूजन करण्याचा हा शुभदिवस. त्याचप्रमाणे आपले जीवन समृद्ध करणाऱ्या आपल्या आयुष्यातील प्रत्येक गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस... "गुरुविण नाही दुजा आधार" या आमच्या पाॅडकास्टच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया गुरुपौर्णिमेबद्दल आणि आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर येणाऱ्या प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष गुरूंबद्दल काही खास... नक्की ऐका "गुरुविण नाही दुजा आधार"
सादरकर्त्या -
सृजनसख्या
सौ. सरोज करमरकर
वैद्य सौ. स्वाती कर्वे
सौ. अपर्णा मोडक
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media
See omnystudio.com/listener for privacy information.
सण आला आषाढी एकादशीचा, आस्वाद घेऊया कीर्तनरंगाचा | Ashadi Ekadashi Special
Season 1 · Episode 9
samedi 9 juillet 2022 • Duration 38:59
Namskar Mauli, Today is the auspicious day, Ashadi Ekadashi... It is a very important day all over Maharashtra. There is an old tradition of Ashadhwari of Pandharpur on this day. We get a wonderful and lively experience from the Vitthal devotion of Warakaris.
'Kirtan' is one of the nine forms of devotion (Bhakti).
We have a tradition of performing kirtan on various religious festivals like Ashadi Ekadashi, Karthiki Ekadashi, Ramjanma, Gokulashtami.
The foundation of Bhagwat Dharma has been laid by many saints including Saint Dnyaneshwar through this 'Kirtan bhakti'.
The purpose of kirtan is not only devotion to God but also social enlightenment, spiritual upliftment, and showing the right direction to society.
Even during the period of foreign invasions, many kirtankars did the work of public awareness and enlightened them with the ideas of patriotism.
So let's get engrossed and join us in this mesmerizing podcast - ' Kirtanrang '
*kirtankar - Dr. Swati Karve,
*Tabla - Atharva Karve
*Harmonium - Viraj Modak
मंडळी, आज आहे आषाढी एकादशी...संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस.. कारण आपल्याकडे पंढरपूरच्या आषाढी वारीची खूप मोठी परंपरा आहे.. भक्तीमार्गाचा एक विलक्षण चैतन्यदायी अनुभव आपल्याला वारकऱ्यांच्या ह्या विठ्ठल भक्तीतून मिळतो.
श्रोतेहो नवविधा भक्तीतील एक प्रकार म्हणजे कीर्तन.
आपल्याकडे आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, रामजन्म, गोकुळाष्टमी अशा वेगवेगळ्या धार्मिक सणांना, किर्तन आणि प्रवचन करण्याची परंपरा आहे..
भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वरांसह अनेक संत मंडळींनी रचला तो ह्या कीर्तन भक्तीद्वारेच.
कीर्तन म्हणजे फक्त ईश्वर भक्ती नव्हे तर त्याचबरोबर समाजप्रबोधन, आध्यात्मिक उन्नती, समाजाला योग्य दिशा दाखवणे हा सुद्धा कीर्तनाचा उद्देश असतो.
आतापर्यंतच्या अनेक परकीय आक्रमणाच्या काळातही समाजप्रबोधनाचे, लोकजागृतीचे कार्य कित्येक कीर्तनकारांनी केले आहे.
चला तर आज आपण आपल्या "उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा" या पोडकास्ट मालिकेअंतर्गत सादर होणाऱ्या कीर्तनरंगात रंगून जाऊया.
सृजन सख्या निर्मिती -
कीर्तनकार - वैद्या सौ. स्वाती कर्वे
तबला - चि. अथर्व कर्वे संवादिनी - चि. विराज मोडक
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media
See omnystudio.com/listener for privacy information.









