Sports कट्टा – Détails, épisodes et analyse

Détails du podcast

Informations techniques et générales issues du flux RSS du podcast.

Sports कट्टा

Sports कट्टा

Ideabrew Studios

Sports
News

Fréquence : 1 épisode/3j. Total Éps: 505

Omny Studio

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

Site
RSS
Apple

Classements récents

Dernières positions dans les classements Apple Podcasts et Spotify.

Apple Podcasts

  • 🇺🇸 États-Unis - cricket

    04/08/2025
    #79
  • 🇺🇸 États-Unis - cricket

    03/08/2025
    #76
  • 🇺🇸 États-Unis - cricket

    02/08/2025
    #73
  • 🇺🇸 États-Unis - cricket

    01/08/2025
    #69
  • 🇺🇸 États-Unis - cricket

    31/07/2025
    #65
  • 🇺🇸 États-Unis - cricket

    30/07/2025
    #54
  • 🇺🇸 États-Unis - cricket

    29/07/2025
    #46
  • 🇺🇸 États-Unis - cricket

    28/07/2025
    #64
  • 🇺🇸 États-Unis - cricket

    27/07/2025
    #59
  • 🇺🇸 États-Unis - cricket

    26/07/2025
    #56

Spotify

    Aucun classement récent disponible



Qualité et score du flux RSS

Évaluation technique de la qualité et de la structure du flux RSS.

See all
Qualité du flux RSS
À améliorer

Score global : 59%


Historique des publications

Répartition mensuelle des publications d'épisodes au fil des années.

Episodes published by month in

Derniers épisodes publiés

Liste des épisodes récents, avec titres, durées et descriptions.

See all

IPL retention rule latest: Will Rohit, Surya, Bumrah, Pant, Gill be in auction?

mardi 27 août 2024Durée 28:20

IPL news trends on social media. IPL speculation trends even more. At a time when the BCCI is yet to announce the retention rules ahead of the 2025 mega auction, rumour mills are abuzz with various players not just entering the auction but even joining another team. Suryakumar Yadav heading to Kolkata Knight Riders, Shubman Gill to be the Punjab Kings captain, Rishabh Pant for Chennai Super Kings and Rohit Sharma and Jasprit Bumrah to be in the auction, just to name a few.
How seriously should such trending news be taken? Let's find out from the Weekly Katta. Over to Sports Katta's Aditya Joshi and The Hindu's sports journalist Amol Karhadkar.
 
IPL आणि मेगा ऑक्शन हा जबरदस्त बातमीचा फॉर्म्युला आहे. कोणत्या संघाला किती खेळाडूंना रिटेन करता येणार हे अजून कोणालाचनक्की  माहित नाही. पण सूर्या निघाला KKR कडे, गिल पंजाबकडे, झहीर खान खान लखनौकडे प्रशिक्षक म्हणून आणि युवराज दिल्लीकडे अशा वेगवेगळ्या बातम्या सोशल मिडियावर रोज येत आहेत. जोपर्यंत रिटेन्शनची हंडी फुटणार नाहीये, तोपर्यंत ही पतंगबाजी सुरू राहणार आहे. साधारण ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत रिटेन्शन येतील. तोपर्यंत या बातम्यांना किती महत्त्व द्यायचं आणि 'ट्रेंडिंग' बातम्यांकडे कसं बघायचं यावर वीकली कट्ट्यामध्ये बोलत आहेत 'द हिंदू' चे अमोल कऱ्हाडकर आणि 'स्पोर्ट्स कट्टा' चे आदित्य जोशी

Mental health awareness through sport, ft Dr Neeta Tatke

samedi 24 août 2024Durée 41:46

'मेंटल हेल्थ' - मानसिक स्वास्थ्य - या विषयावर अखेर सखोल चर्चेला सुरुवात झाली आहे. मानसिक स्वास्थ्य हे उत्तम आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे, हे आपण सगळीकडून एकतो. कुठलाही खेळ नियमाने खेळणं किंवा व्यायाम करत असणं ही तज्ज्ञांच्या मानसिक स्वास्थ्याची गुरुकिल्ली आहे. यासाठी वयाचं बंधन नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाने करायची ही गोष्ट आहे. हे अंमलात कसं आणायचं आणि आणि त्याने नक्की कसा फरक पडतो हे आपल्याला सांगत आहेत डॉ. नीता ताटके. गेली पाच दशकं मल्लखांब क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या डॉ. ताटके 'स्पोर्ट्स आणि मेंटल हेल्थ' या विषयात डॉक्टरेट आहेत. "आधी केले मग सांगितले" या उक्तीप्रमाणे डॉ. ताटके क्रीडा व मानसिक स्वास्थ्य यांचं नातं उघडून दाखवत आहेत आदित्य जोशीशी मारलेल्या कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये. 

Mental Health Awareness has finally started being discussed as an integral elements for a healthy lifestyle. Experts and studies have proven that a healthy or active body is the key for a healthy mind. To participate in sporting or fitness activity consistently has helped scores of individuals to improve their mental health. Even following sport also helps manage stress for working professionals. But how can individuals from various age-groups and professional backgrounds strike this balance? Let's hear it from Dr. Neeta Tatke - a Mallakhamb pro for five decades who has a doctorate on the same topic - who spells out of the importance of sports for mental health in Kattyavarchya Gappa with Aditya Joshi.

Abhinav Bindra, the friend; Nana Patekar, the mentor: Anjali Bhagwat exclusive

samedi 13 juillet 2024Durée 32:29

Abhinav Bindra and Anjali Bhagwat are the first names that come to mind when one thinks about shooting as a sport in India. In the early 2000s, Anjali dominated the sport and was the World Champion, having taken up the sport only during her NCC (National Cadet Corps). Her journey was far from beig easy. In the 2000 Sydney Olympics, Anjali reached Australia to compete but her ammunition did not get to Sydney due to bureaucratic issues. She also sheds light on why Abhinav Bindra deserved to win the gold medal at the 2008 Beijing Olympics and how shooting has changed in the last few decades. On Kattyawarchya Gappa, Anjali hits the bull's eye while taking us down the memory lane and taking a deep dive into the world of shooting  

भारतात ऑलिंपिक आणि नेमबाजी म्हटलं, कि अभिनव बिंद्राबरोबरच मराठमोळ्या अंजली भागवतचं नावदेखील लगेच डोळ्यासमोर येतं. NCC मध्ये असताना अंजलीने नेमबाजी करायला सुरुवात केली आणि आपल्या कामगिरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. २०००च्या दशकात तिने आपल्या कामगिरीने जग जिंकलं.  तिचा हा प्रवास नक्की किती खडतर होता? २००० सिडनी ऑलिंपिकसाठी ती ऑस्ट्रेलियात पोहोचली खरी, पण तिच्या रायफलचं गोळाबारूद मात्र पोहोचू शकलं नाही. त्याच ऑलिंपिकमध्ये ती टेनिसपटू मोनिका सेलेसला भेटली, अर्थात त्यासाठी तिला अभिनव बिंद्रावर दादागिरी करावी लागली... पण अभिनवला सुवर्णपदक का मिळालं, हे सुद्धा अंजली सांगते. २००० च्या दशकातील नेमबाजी आणि २०२४ मध्ये भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी असलेली चुरस आणि नेमबाजीचं बदलतं स्वरूप, हा सगळा प्रवास उलगडला आहे भारताची ऑलिंपियन नेमबाज अंजली भागवतने 'कट्ट्यावरच्या गप्पां'मध्ये अमोल गोखलेबरोबर

Ankit Bawane च्या MPL आठवणी आणि त्याची कोल्हापुरातील सर्वात आवडती गोष्ट

mercredi 14 juin 2023Durée 10:04

Maharashtra Ranji captain Ankit Bawne is ready to get going for Kolhapur Tuskers in Maharashtra Premier League (MPL). Tuskers are stacked with big hitters like Bawne, icon player Kedar Jadhav and MPL’s most expensive player, Naushad Shaikh, and young guns like Sahil Autade and Sachin Dhas. Amol Gokhale had a candid conversation with Ankit Bawne in 'CCBK Special' on the sidelines of the team’s practice session in Pune about memories of previous MPL, playing for the Kolhapur team, and what he loves the most about the city of Kolhapur.

 
महाराष्ट्राचा रणजी संघाचा कर्णधार अंकित बावणे महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) मध्ये कोल्हापूर टस्कर्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. अंकितच्या जोडीला संघात आयकॉन खेळाडू म्हणून केदार जाधव तर आहेच पण MPL च्या लिलावातील सर्वाधिक किमतीचा नौशाद शेख देखील आहे. ह्या अनुभवी खेळाडूंच्या जोडीला सचिन धस आणि साहिल औताडे असे युवा खेळाडूदेखील आहेत. CCBK च्या ह्या विशेष भागात अमोल गोखलेने अंकितशी गप्पा मारल्या आहेत MPL बद्दल. अंकित सांगत आहे त्याच्या MPL च्या जुन्या आठवणी, कोल्हापूरकडून खेळतानाच्या भावना आणि कोल्हापूरबद्दलची आवडती गोष्ट.

Saaptahik CCBK, Team India घेईल ह्यातून धडे का पहिले पाढे पंचावन्न?

lundi 12 juin 2023Durée 18:43

Shubman Gill’s ‘inconclusive’ catch dismissal has become the big talking point of the World Test Championships (WTC) Final between India and Australia. Did India really lose the game at that point? The clear answer is No. But, did India lose the plot and the match on the first day itself? Did the team err in selection? But now the more significant and obvious question is ‘What Next?’ Amol Karhadkar, Aditya Joshi, and Amol Gokhale analyze the WTC Final in this episode of Saaptahik CCBK… 

शुबमन गिलचा वादग्रस्त झेल हा भारत आणि ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्यातील मोठा चर्चेचा मुद्दा ठरला आहे. पण भारताने नक्की ह्या एका निर्णयावर सामना गमावला का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. सामन्यासाठी संघ निवड योग्य होती का? आणि पहिल्या दिवशी जेव्हा संघ पिछाडीवर गेला तेव्हाच सामना हातातून निसटला होता का? आणि त्याहून कळीचा प्रश्न म्हणजे, आता पुढे काय? साप्ताहिक CCBK च्या ह्या भागात अमोल कऱ्हाडकर, आदित्य जोशी आणि अमोल गोखले WTC फायनलचं विश्लेषण करत आहेत..

MPL साठी प्रेक्षकांइतकेच खेळाडू पण उत्सुक

mercredi 7 juin 2023Durée 11:45

Maharashtra Premier League (MPL) is making a comeback after 2011 and it has piqued the interest of cricket lovers in the state. CCBK’s Amol Gokhale was able to attend the player auction and got insights into the proceedings. Which players were most sought after? How are teams stacked up? He also spoke to players and stakeholders and even they were just as excited as fans to get going with MPL... 

महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) २०११ नंतर पुन्हा सुरु होत आहे आणि ही जणू नवीन स्पर्धा आहे असाच उत्साह चाहत्यांमध्ये आहे. CCBK चा सदस्य अमोल गोखले खेळाडूंच्या लिलावास उपस्थित होता आणि त्यानी लिलावाची पडद्यामागची दुनिया अनुभवली म्हणजेच behind the scenes access . कुठल्या खेळाडूंना सर्वाधिक मागणी होती? सहा संघानी त्यांची बांधणी कशी केली आहे? आणि एक गोष्ट नक्की: प्रेक्षक जितके MPL साठी उत्सुक आहेत, तितकेच खेळाडू देखील जून १५ची आतुरतेने वाट बघत आहेत.

Saaptahik CCBK, Team India संपवेल का ICC ट्रॉफीचा दुष्काळ?

mardi 6 juin 2023Durée 22:31

The World Test Championships final is upon us. India have made it to yet another final and face mighty Australia at the Oval in London for the coveted ICC mace. Who will be India’s third seamer? Will it decide whether or not India fields two spinners or goes with the extra pacer? Cheteshwar Pujara holds the aces for stalwart Indian batting lineup. Kangaroos look favourite on paper but will the lack of match practice come to haunt them in crucial moments? Amol Karhadkar, Aditya Joshi and Amol Gokhale preview the WTC final in this episode of Saaptahik CCBK…

भारत आणि ऑस्ट्रेलिया ह्यांचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना काही तासांवर येऊन ठेपला आहे.  सोमवारी झालेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये संघ निवडीबद्दल मौन बाळगलं गेलं. पण भारत चौथा वेगवान गोलंदाज खेळवणार का दोन फिरकी गोलंदाज खेळवणार हा एकमेव कळीचा मुद्दा आहे. कौंटी क्रिकेट खेळणाऱ्या चेतेश्वर पुजारा  भारतीय फलंदाजीचा कणा असेल. कागदावर ऑस्ट्रेलियाचा संघ बलाढ्य वाटतो आहे पण त्यांचे काही प्रमुख खेळाडू गेला काही काळ स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहेत, त्याचा त्यांना फटका बसू शकतो का? अमोल कऱ्हाडकर, आदित्य जोशी आणि अमोल गोखले ह्या अंतिम सामन्याचं पूर्वावलोकन म्हणजेच प्रिव्हू साप्ताहिक CCBK मध्ये..

India आणि Australia चा WTC final पर्यंतचा प्रवास

vendredi 2 juin 2023Durée 10:53

दोन वर्षांपूर्वी न्यूझीलँड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हरल्यानंतर भारताने तिथेच इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा WTC फायनल गाठायची तयारी सुरु केली. पण त्या दोन वर्षात बरंच काही बदललं आहे. विराट कोहली-रवी शास्त्री ह्यांच्या ऐवजी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड ह्यांच्याकडे संघाची धुरा आहे. अनेक प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे अनुपलब्ध आहेत, पण तश्या परिस्थितीत देखील भारताने ऑस्ट्रेलियावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी वर आपलं नाव कोरून इंग्लंड वारी पक्की केली. आणि आता मानाच्या विजेतेपदासाठी भारताचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी इंग्लंडच्या वातावरणात होणार आहे. पण त्याआधी CCBK च्या ह्या विशेष भागात अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले भारत आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोन्ही संघांचा द ओव्हल, लंडन पर्यंतचा प्रवास...     

India began their second journey towards the World Test Championships (WTC) final in England, on the back of the loss in the inaugural WTC final. Two years later, India face Australia for the coveted trophy. Much has changed in those two years, from India visiting neighbours Bangladesh to the Rohit Sharma-Rahul Dravid duo at the helm instead of Virat Kohli & Ravi Shastri. Similarly, under the leadership of Pat Cummins, Aussies have become a force to reckon with and have stormed to the WTC final, despite losing the Border-Gavaskar Trophy to India just a couple of months back. In this WTC finals curtain raiser, Amol Karhadkar and Amol Gokhale look at India’s and Australia’s road to the Oval, London.

MS Dhoni चा करिष्मा आणि CSK ची पुन्हा विजयला गवसणी

mardi 30 mai 2023Durée 24:29

वीस षटकांचा सामना ज्याला मराठी मध्ये T२० म्हणतात, तो सामना तब्बल तीन दिवस चालला. तमाम भारतीयांच्या मनात जी धाकधूक होती की हा महेंद्र सिंह धोनीचा शेवटचा IPL सामना ठरेल का?, पण ती भीती 'थालाने' तूर्तास निराधार ठरवली आहे. वर दुग्धशर्करा योग म्हणून चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा IPL चे विजेतेपद पटकावले. गुजरात टायटन्सने त्यांचं गेल्यावर्षीचं यश निर्भेळ होतं हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. शुबमन गिलची फलंदाजी बघून क्रिकेटप्रेमी नक्कीच सुखावले असणार आहेत. चाहत्यांना धोनीला फलंदाजी करताना बघता यावं म्हणून ज्या रवींद्र जाडेजानी बाद व्हावं असं वाटत होतं, त्याच जाडेजाने चेन्नईला IPL विजेतेपद मिळवून दिलं. IPL च्या ह्या आणि अशा अनेक पैलूंवर अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले चर्चा करत आहेत CCBK च्या ह्या विशेष भागात...

No one imagined that the IPL 2023 final would last three days. At the end of it, the ‘announcement’ did not come from MS Dhoni, but we all saw him lift the IPL trophy for the fifth time. Led by Hardik Pandya, Gujrat Titans wore hearts on their sleeves and were a worthy match for Chennai Super Kings in the final. Indian cricket fans’ hearts will surely go out to the new superstar on the horizon — Shubman Gill. For the first 16 games, fans wanted Ravindra Jadeja to get out cheaply but in the wee hours of Monday, they all prayed that he would finish things off in style. In this truly special episode of CCBK, Amol Karhadkar and Amol Gokhale take a deep dive into the IPL season that was and MSD’s magical CSK…

Gill ने केलं Mumbai Indians ला गारद, कोण जिंकणार IPL final?

samedi 27 mai 2023Durée 14:14

गुजरात टायटन्सने IPL २०२३ च्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर विजय मिळत मुंबई इंडियन्सला प्लेऑफ्समध्ये पोहोचवलं. त्या सामन्यात शतक झळकावून मुंबई इंडियन्सचा लाडका झालेल्या शुबमन गिलने “तुम आए नही लाए गये हो” या हिंदी सिमेनाच्या डायलॉग प्रमाणे मुंबईच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. मोहित शर्माने देखील ५ बळी टिपत सामना गुजरातच्या हातून कधीच निसटणार नाही ह्याची खात्री केली. मुंबई नक्की कुठे कमी पडली? IPL २०२३ चा सलामीचा व अंतिम सामना आता चेन्नई विरुद्ध गुजरात होणार आहे. ह्या सामन्यात कुठल्या बाबींवर यंदाचा विजेता ठरेल ह्या गोष्टींचा आढावा घेत आहेत आदित्य जोशी आणि अमोल गोखले, CCBK च्या विशेष भागात.


Gujarat Titans' win in the last league match of IPL 2023 against Royal Challengers Banglore allowed Mumbai Indians to sneak through to the Playoffs. Shubman Gill scored a fantastic century in that match and Mumbai Indians fans were in awe of his talent. The same Shuman Gill destroyed Mumbai Indians attack in the second qualifier and took Gujarat Titans to their second consecutive IPL final. Aditya Joshi and Amol Gokhale analyse the game and predict the outcome of the tantalising final between Chennai Super Kings and Gujarat Titans


Podcasts Similaires Basées sur le Contenu

Découvrez des podcasts liées à Sports कट्टा. Explorez des podcasts avec des thèmes, sujets, et formats similaires. Ces similarités sont calculées grâce à des données tangibles, pas d'extrapolations !
Il n'y a pas de contenu associé à ce podcast.
© My Podcast Data